गावाची ग्रामपंचायत

सोनवडे तर्फ कळसुली हे महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील एक उपक्रमशील, कृषीसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सजग गाव आहे. सोनवडे तर्फ कळसुली हे गाव तालुका मुख्यालय कुडाळ (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे 55 किमी आणि जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गपासून सुमारे किमी अंतरावर स्थित आहे. या गावामध्ये 12वाड्या आहेत. गावची लोकसंख्या २०५९ इतकी आहे. गावातील लोक गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे उत्सव एकोप्याने साजरे करतात. गावामध्ये तीन प्राथमिक शाळा आहेत. गावात एक सुसज्ज अशी ग्रामपंचायत आहे त्यामध्ये 9कार्यकारिणी सदस्य, ग्रामसेवक व 2 कर्मचारी आहेत.